भाजपला शह देण्यासाठी विरोधकांचा मास्टर प्लॅन

दिल्ली | ‘राज्य पातळीवरील मुद्दयांबद्दल विरोधी पक्षांची भलेही वेगवेगळी मते असतील, पण राष्ट्रीय मुद्द्यांवर मात्र भाजपच्या विरोधात सर्वानी एकत्र यायला हवं, असं मत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी व्यक्त केलंय.

गुरुवारी संसदेच्या लायब्ररीमध्ये सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक पार पडली. त्यावेळेस 17 पक्षांचे नेते उपस्थित होते. अर्थसंकल्पावर सरकारला घेरण्यासाठी या बैठकीचं अायोजन केल्याचं समजतंय.

दरम्यान, सोनिया गांधी यांच्या या आवाहनामुळे सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपला नवा पर्याय निर्माण करण्याची दाट शक्यता आहे.