बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सोनिया गांधींनी शब्द दिलाय, काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढेल, असं पटोले सातत्याने सांगत आहेत. पटोेले यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेस पक्ष पाच वर्ष शिवसेनेसोबत सत्तेत राहणार असल्याची ग्वाही पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही ग्वाही दिली आहे. माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, स्वबळाचा नारा देणं चुकीचं नाही. यात काहीही गैर आहे असं मला वाटत नाही. स्वबळाचा नारा दिल्यानं महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही.

तसेच काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्ष राहणार असल्याचा शब्द सोनिया गांधी यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल, असंही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आतापासूनच वर्तवली जात आहे. कारण भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी अगोदरच भाजप स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं आहे आणि आता नाना पटोले देखील सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘आदित्य दादा, राजगडावर रोपवे बांधू नका’; चिमुकल्या गडप्रेमीचं पर्यटनमंत्र्यांना पत्र

भन्नाट ऑफर! लस घेतल्यास पब आणि बारमध्ये मिळणार 50% सूट

जम्मू काश्मीरला पुन्हा स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याचा तयारीत

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा ‘या’ वयोगटातील लोकांना अधिक धोका!

“ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More