बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये, बोलावली महत्वाची बैठक; ‘या’ गोष्टींवर होणार चर्चा?

नवी दिल्ली | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील दिल्लीत महत्वाची बैठक बोलावली आहे. 24 जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.

24 तारखेला होणाऱ्या या बैठकीत पक्षाचे सर्वच सरचिटणीस, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. तसेच महाविकास आघाडीच्या दृष्टीने देखील ही बैठक महत्वाची असल्याचं बोललं जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळाचा नारा देत आहेत. यामुळे महाराष्ट्रात आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष कसा लढणार यावर देखील या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढेल, असं पटोले सातत्याने सांगत आहेत. पटोेले यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे.

पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आत्तापासूनच वर्तवली जात आहे. कारण भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी अगोदरच भाजप स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं आहे आणि आता नाना पटोले देखील सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत.

थोडक्यात बातम्या-  

“मेंदू तल्लख आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”

“विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही”

बलात्कारासाठी महिलांचे कपडेच जबाबदार – इम्रान खान

आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?; काँग्रेसचा थेट सवाल

‘​​द ग्रेट खली’च्या आई तांदी देवी यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More