बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सोनिया गांधी राजकारणात सक्रिय नाहीत, ‘यूपीए’ला सक्षम करण्यासाठी शरद पवारांनी नेतृत्व करावं”

नाशिक | शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ‘यूपीए’च्या नेतृत्वाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सोनिया गांधी सध्या राजकारणात सक्रिय नाहीत. त्यामुळे ‘यूपीए’चं नेतृत्व शरद पवारांनी करावं असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेचं सचिन वाझे प्रकरणावर बोलताना कुणीही आलं आणि कोणत्याही प्रकरणाचा तपास केला तर सत्य समोर येईलच. संजय राऊत यांनी नाशिक महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार यांनी ‘यूपीए’चे नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केलं. देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं. आतापर्यंत सोनिया गांधी यांनी ‘यूपीए’चं नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं. मात्र, सोनिया गांधी सध्या राजकारणात सक्रिय नाहीयेत, असंही राऊत म्हणाले.

कोरोना राज्यभरात वाढत आहे. मी शिवसेनेच्या नेत्यांशी, पालिकांच्या नेत्यांशीही चर्चा केली. नाशिकच्या कोरोनावाढीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. राज्यात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. कारण राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. तसेच महाराष्ट्रात सगळीकडे व्यवस्थित लसीकरण सुरु आहे. मुख्यमंत्री यासंदर्भात लक्ष घालून आहेत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, सकाळी सहा वाजता त्यांनी शपथ घेतली, हा मग घोडेबाजार नव्हता का? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला. नाशिक शहराला नेमकं काय पाहिजे? काय योजना राबवता येतील, यासाठी शिवसेनेची योजना तयार होत आहे. याबाबत सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी देखील ती माहिती मुख्यमंत्र्यांना देणार, असं संजय राऊत यावेळी बोलत होते.

थोडक्यात बातम्या –

“रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षापासून विकास डाऊन”

‘कोरोना रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून…’; ‘या’ मराठी अभिनेत्रीने केला संताप व्यक्त

मास्क नाही घातलं म्हणून केली चौकशी, चिडलेल्या महिलेने केली पालिका कर्मचारिकेची पिटाई, पाहा व्हिडीओ

जॉन अब्राहमवर आली सिनेमाची तिकीटं विकण्याची वेळ, पाहा व्हिडिओ

“मिस्बाह-उल-हक म्हणजे गरीबाचा एम.एस. धोनी”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More