देश

गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा- सोनिया गांधी

नवी दिल्ली | केंद्र सरकारने देशातली सर्व गरीब आणि मजुरांच्या बँक खात्यात तातडीने 7 हजार 500 रुपये जमा करावे, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. तसेच मजुरांना अन्नाचा पुरवठा व्हावा यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत, असं देखील सोनिया गांधी म्हणाल्या.

काँग्रेस कार्यकारी समितीची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे की, टेस्टिंगवर काहीच पर्याय नाही. मात्र, तरीही देशात कोरोना टेस्टिंग फार कमी प्रमाणात होत आहेत. आम्ही सरकारला अनेक सल्ले देत आहोत. मात्र सरकार त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करताना दिसत नाही, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला.

लॉकडाऊनमुळे देशातील शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. शेतकरी हतबल झाला आहे. त्यांच्या समस्यांचं लवकरात लवकर निराकरण करायला हवं. खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना मदत करायला हवी, अशीदेखील मागणी सोनिया गांधी यांनी यावेळी केली.

ट्रेंडिंग बातम्या-

गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश

महत्वाच्या बातम्या-

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार

कोरोना इतक्यात जग सोडून जाणार नाही, आपल्याला आणखी भरपूर मोठा पल्ला गाठायचाय- WHO

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या