बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनिया गांधींनी पुन्हा एकदा दाखवला ‘या’ नेत्यावर विश्वास सोपवली महत्वाची जबाबदारी 

नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी या राज्यांत काँग्रेस फारशी चांगली कामगिरी करू शकली नाही. या पराभवानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची नुकतीच बैठक झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी पाच राज्यांतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे.

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद, मनीष तिवारी, व्हिन्सेंट एच. पाला आणि जोथी मनी यांचा या समितीत समावेश आहे. पाच राज्यांना भेट देऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी, उमेदवारांशी आणि राज्याच्या नेतृत्वाशी चर्चा करून ही समिती एक अहवाल तयार करेल आणि तो काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींसमोर सादर करणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये काॅंग्रेसची वाईट अवस्था झाली आहे. पहिल्यांदाच काँग्रेसला एकही सीट मिळाली नाही. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातही त्यांचा पराभव झाला. केरळमध्ये सत्तेत परतण्याची शक्यता काँग्रेसला वाटत होती पण ते शक्य झालं नाही. आसाममध्येही  काँग्रेसचा पराभव झाला. पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात गेल्यावेळी काँग्रेसचं सरकार बनूनही यावेळी त्यांचा पराभव झाला. जमेची बाजू म्हटलं तर फक्त तमिळनाडूमध्ये डीएमकेसोबत काँग्रेस पक्ष 10 वर्षांनंतर सत्तेत आला आहे.

दरम्यान, ‘आपण एक समिती तयार करू ती पराभवाच्या प्रत्येक पैलूवर विचार करेल. केरळ आणि आसाममध्ये का पराभव झाला हे आपण शोधून काढलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये आपल्या हाताला एकही जागा लागली नाही. या गोष्टी त्रासदायक असल्या तरीही त्यांचा सामना करून त्याबाबत विचार करायला हवा. याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला यातून धडा घेता येणार नाही,’ असं काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या

आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना आजीने उघडले डोळे अन्…

कोरोनानंतर होणारा ‘म्युकरमायकोसिस’ आजार नेमका आहे तरी काय? वाचा संपुर्ण माहिती

शरीरसंबंध ठेवताना फोटो काढले अन्… पुण्यातील घटनेनं खळबळ

उत्तर प्रदेशच्या जमावाकडून पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला; गाडीची तोडफोड

पुण्यात पेट्रोलने गाठली शंभरी; इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More