बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर काँग्रेसचा अध्यक्ष ठरला, कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत सोनिया गांधीच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच नवीन अध्यक्षाची निवड पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

पुढील वर्षी पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमुळे सध्या काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात निवडणूक घेऊन पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल आणि ती व्यक्ती आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशी माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला नवा अध्यक्ष मिळणार का? या प्रश्नाला तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. राहुल गांधी त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधींच्या हाती पक्षाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र या  पक्षाला सपाटून मारखावा लागला होता. या निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यावर पक्षाची कमान सोनिय गांधी यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून आपल्या हाती घेतली. मात्र, यादरम्यान काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, अशी मागणी काँग्रेसमध्ये वारंवार केली जात होती.

मीच काँग्रेस पक्षाची पूर्णवेळ अध्यक्ष आहे. मी नेहमीच स्पष्टपणे पक्षाचे निर्णय घेत असते. माध्यमांमधून माझ्यासोबत बोलण्याची गरज नाही. आपण सर्वांनी प्रामाणिकपण चर्चा केली पाहिजे. आम्ही 30 जूनपर्यंत काँग्रेसच्या नियमित अध्यक्षांच्या निवडीचा रोडमॅप तयार केला होता पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

“पंजाबला अशांत होऊ देऊ नका, आपण इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत मोठी किंमत मोजली”

नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले…

‘तालुक्यात विकास केल्यामुळं मला शांत झोप लागते’; भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

जर कोणी धर्माची मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मी…- उद्धव ठाकरे

आरोग्यमंत्री रूग्णालयात फोटोग्राफर घेऊन आले अन् मनमोहन सिंग यांची मुलगी संतापली

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More