‘देशाला गप्प बसवून प्रश्न सुटणार नाहीत’; सोनिया गांधींनी मोदींना सुनावलं
नवी दिल्ली | देशाला गप्प बसवून प्रश्न सुटणार नाहीत, असं म्हणत काँग्रेस (Congress) संसदीय समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
पंतप्रधानांनी जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर मौन बाळगले आहे. त्यांच्या सरकारच्या कामकाजाचा कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम होताे. मोठ्या मुद्द्यांवर जेव्हाही न्याय्य प्रश्न विचारण्यात येतो, तेव्हा पंतप्रधान त्यावर मौन बाळगतात, असंही सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाल्या.
राज्यघटनेच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष सर्व समविचारी पक्षांसोबत काम करण्यास तयार आहे, असंही सोनिया गांधी (Sonia Gandhi) यावेळी म्हणाल्यात.
धार्मिक सण हे आता आनंदाचं व उत्सवाचं सण राहिलेले नाहीत तर इतरांना धमकाविण्याची, त्रास देण्याची संधी बनले आहेत, असंही त्या म्हणाल्यात.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.