मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलंय. महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे या पत्राद्वारे केलीये.
दरम्यान, यापुढे भविष्यात आदिवासी दलित लोकांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची शाश्वती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलीये. याची माहिती महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडून देण्यात आलीये.
एच.के.पाटील म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या बैठकीत ST आणि SC विकासाच्या वर चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्षांनी चर्चा केलीये. यावेळी निधीबाबतही चर्चा झाली.”
शिवाय, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा निर्णय येत्या 1 ते 2 आठवड्यात होणार, असल्याचंही पाटील यांनी सांगितलंय.
थोडक्यात बातम्या-
…तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?- हसन मुश्रीफ
अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण; नाटकाचे प्रयोग केले रद्द
“करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकारच्या काळात का नाही केली”
OLX पे बेच दो…पंतप्रधान मोदींचं कार्यालय चक्क OLX वर विक्रीला
उडता कोहली! हवेत झेप घेत कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पाहा व्हिडीओ