बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फटे लेकीन हटे नही, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना हतबलतेनं बीफचंही समर्थन करावं लागतंय”

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी एकत्र येत भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त सर्व खासदार दिल्लीमध्ये आहेत. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधी 14 पक्षांची एकत्र बैठक बोलावली होती. या बैठकीत विरोधी पक्षातील जवळपास 100 खासदार उपस्थित होते.

बैठकीस शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. या बैठकीनंतरचा संजय राऊत आणि राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये राहुल गांधी यांनी संजय राऊतांचा खांद्यावर हात टाकलेला दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोवरुन आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर करत विरोधी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. फटे लेकीन हटे नही, असा टोला वाघ यांनी विरोधकांना लगावला आहे.

सोनियासेना प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांचा केंद्र सरकारबद्दलचा द्वेष उफाळून येणारच होता. म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय. ठाकरे सरकारने मागील 2 वर्षात फटे लेकीन हटे नहीच धोरण कसं राबवलं, हे जनतेला देखील माहित आहे, असा घणाघात वाघ यांनी केला आहे.

दरम्यान, काल कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये विरोधी पक्षातील खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीस दोन्ही सदनातील खासदारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मोदी सरकारला घेरण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

“पवार कुटुंब किती लबाड आहे हे राज्याला चांगलं माहित आहे”

सोनाली कुलकर्णीचा बोल्ड बिकीनी लुक पाहून सर्वच हैराण, सोनालीचे मालदीवमधले फोटो व्हायरल

धक्कादायक! पुरुषांपेक्षा जास्त ‘या’ स्त्रियांना पाॅर्न पाहण्यात अधिक रस, अभ्यासातून झाला ‘हा’ खुलासा

ऑलिम्पिकमध्ये रंगणार भारत पाकिस्तान सामना; ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर भारताची धूरा

पोस्ट ऑफीसच्या किसान विकास पत्र या योजनेतुन दाम दुप्पट करण्याची सुवर्णसंधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More