बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकांना सतत भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले जात आहे”

जयपूर | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. अशातच राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसचं तीन दिवसांचे चिंतन शिबिर पार पडत आहे. नवसंकल्प चिंतन शिबिराच्या उद्घाटन सत्रावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कमाल शासन किमान सरकार या घोषणेचा अर्थ काय आहे?, हे आतापर्यंत केलेल्या कार्यावरून दिसून येत आहे. देशामध्ये कायम धुर्वीकरण करणे,  लोकांना सतत भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जगण्यास भाग पाडते आणि प्रजाकसत्ताकचे समान नागरिक असलेल्या अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणे, असा घणाघात सोनिया गांधींनी केला.

पक्ष आणि वैयक्तिक पातळीवर आपण सर्वांनी चिंतन आणि आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. संघटनेमध्ये बदल ही काळाची गरज असून काम करण्याची पद्धती बदलण्याची गरज आहे, असं सोनिया गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना म्हटलं आहे.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी यावेळी बोलताना एकत्रित काम करण्याचे आवाहन केले आहे. आपण सर्वंजण मोठ्या आणि एकत्रित प्रयत्नांनीच बदल घडवून आणू शकतो, असं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. पक्षाच्या नेत्यांनी चिंतन शिबिरामध्ये आपली मते मांडावीत जेणेकरून ज्यामधून मजबूत पक्ष आणि एकतेचा संदेश गेला पाहिजे, असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

रशियाचा पुन्हा आक्रमक पवित्रा; पुतिन यांचा ‘या’ देशाला गंभीर इशारा

राज्यात ‘या’ भागात तीव्र उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा इशारा

मोठी बातमी! नवाब मलिकांना सत्र न्यायालयाचा दिलासा

पुणे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बॉम्बसदृश वस्तूबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

“…तर तुम्हाला देखील याच कबरीत जावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More