बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी इंदिरा गांधींची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही”

नवी दिल्ली | नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची यासंबधी सलग चार दिवस चौकशी करण्यात आली होती. सोनिया गांधी यांनाही बोलवण्यात आलं होत. मात्र काही वैद्यकीय कारणांमुळे त्या चौकशीला सामोरे जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आज त्या ईडी चौकशीला गेल्या होत्या. आज त्यांची सकाळी 9 वाजल्यापासून चौकशी सुरू होती.

यासंबधी महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नान पटोले यांनी सोनिया गांधी यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यात त्या म्हणत आहेत. मी इंदिरा गांधीची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही, असं वक्तव्य त्यांनी या व्हिडीओत केलं आहे. यासोबत पटोलेंनी हॅशटॅग वापरला आहे. सत्य_साहस_सोनिया असा हॅशटॅग (Hashtag) वापरला आहे. हा व्हिडीओ जुना आहे. तो कोणत्या वेळीचा आहे यासंबधी अजून काही माहिती मिळाली नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

यासंबधी राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी जीएसटीवर (GST) चर्चा करा तर सभागृह तहकूब, महागाई चर्चा करा तर सभागृह तहकूब, अग्निपथवर चर्चा करा तर सभागृह तहकूब, एजन्सीचा गैरवापर यावर बोललं तर सभागृह तहकूब केलं जातं. असं वागत सामान्य जनतेचा आवाज दाबला जात आहे. या अंहकार आणि हुकुमशाहीवर सत्याचाच विजय होईल, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

सोनिया गांधींच्या चौकशीचे आदेश देताच अनेकांनी यावर टिका केली होती. काँग्रेसला  (Congress) पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. आजही काही ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहे. यामध्ये माजी मुुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश होता.

 

 

थोडक्यात बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; सर्व सण धुमधडाक्यात साजरे होणार

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

माहेरी गेलेल्या बोयकोला परत आणा म्हणत तरुण चक्क टॉवरवर चढला!

“उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, जे जे त्यांच्या नादी लागले ते…”

उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय एकनाथ शिंदेंकडून मागे, आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More