राहुलनं लहानपणापासून दुःख सोसलं, मला त्याचा अभिमान!

नवी दिल्ली | राहुलने लहानपणापासून अपार कष्ट सोसलं. राजकारणात आल्यानंतर त्याने वैयक्तिक टीका सहन केली. त्यातून तो कणखर झाला. माझा मुलगा आहे म्हणून त्याचं कौतुक करणार नाही, मात्र मला त्याचा अभिमान आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं. 

राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी त्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या आठवणींनी भावूक झालेल्याही पहायला मिळाल्या. 

इंदिरांनी मला मुलीसारखं स्वीकारलं. इथल्या संस्कृतीशी ओळख करुन दिली. त्यांची हत्या झाली तेव्हा माझी आई माझ्यापासून हिरावून घेतली. त्यानंतर राजीव यांची हत्या करुन माझा आधार माझ्यापासून हिसकावला, असं म्हणत सोनियांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.