नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (यांनी सोमवारी सकाळी तिहार तुरुंगात चिंदबरम यांची भेट घेतली.
सीबीआय आणि ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. चिदंबरम यांच्या जामीनासंदर्भात अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही किंवा इतक्यात त्यांना जामीन मिळण्याची शक्यता दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी चिंदबरम यांची भेट घेतली. याआधी मुलगा किर्ती याने चिदंबरम यांची भेट घेतली होती.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांनी देखील चिदंबरम यांची भेट घेतली होती. त्यावेळी चिदंबरम यांचा मुलगा देखील उपस्थित होता.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून चिदंबरम यांची प्रकृती ठीक नसल्याचं वृत्त आहे.
महत्वाच्या बातम्या-
राहुल आवारे ठरला जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा पहिला मराठमोळा पैलवान!https://t.co/L8kWrZ0DTk @rahulbaware1
— थोडक्यात (@thodkyaat) September 23, 2019
माजी कसोटीपटू माधव आपटे यांचं निधन https://t.co/XW6ipGvjuD
— थोडक्यात (@thodkyaat) September 23, 2019
कलम 370 ला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं जागा दाखवून द्यावी- अमित शहा https://t.co/7A9HuQk1hE @AmitShah
— थोडक्यात (@thodkyaat) September 23, 2019
Comments are closed.