बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचे ते सात आमदार अडचणीत; हायकमांड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यावेळी पक्षादेश मोडणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार नाही, असा सर्वांना वाटत होतं. पण आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यासंदर्भात अहवाल मागवला आहे. या अहवालानंतर पक्षादेश मोडणाऱ्या होणार अशी सगळीकडे चर्चा आहे.

विधानपरीषद निवडणूकीत पक्षाच्या व्हिपला न जुमानता झालेलं मतदान, विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी 11 आमदारांनी मारलेली दांडी आणि औरंगाबादच्या नामांतर प्रस्तावाला विरोध केला नसल्याचा प्रकार. या सर्व प्रकरणांची काँग्रेस पक्षप्रमुखांनी गंभीर दखल घेतली आहे. आणि आता त्या अनुषंगाने सोनिया गांधी यांनी अहवाल मागवला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांना हा अहवाल बनवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

महाराष्ट्र काँग्रेसमधील असंतोष पुन्हावर आल्याचं नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसून आलं. काँग्रेसच्या 7 आमदारांनी पक्षाचा व्हिप पायदळी तुडवत पक्षाच्या आदेशा विरुद्ध मत दिलं. त्यामुळे काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्कारावा लागला. तसेच शिंदे गटाच्या विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळी काँग्रेसचे 11 आमदार गैरहजर राहिले. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे दोघेही होते.

महाविकास आघाडी सरकारने जाण्याअगोदर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचं नामांतर करण्याचा प्रस्ताव संमत करुन घेतला. यावेळी काँग्रेस आमदारांनी या प्रस्तावाला विरोध केला नव्हता. त्यामुळे पक्षात सध्या नाराजीचं वातावरण आहे. आता सोनिया गांधींनी यासंदर्भात विशेष दखल घेत अहवालच मागवला आहे. त्यामुळे आता यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

थोडक्यात बातम्या –

राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपून काढणार; अति मुसळधार पावसाची शक्यता

आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ; जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा लेकाच्या पक्षाला रामराम

शिंदे सरकारचा उद्धव ठाकरेंना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“शिवसेना पुन्हा कधीच उभी रहाणार नाही, शिवसेनेेची आजची अवस्था ठाकरे पिता-पुत्रामुळेच”

अमरनाथ ढगफुटीतील मृतांचा आकडा वाढला, महत्त्वाची माहिती समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More