‘ढोंग आणि बढाया’ हेच मोदी सरकारचं तत्वज्ञान, सोनिया गांधींचा बोचरा वार

नवी दिल्ली | ‘ढोंग आणि बढाया’ हेच मोदी सरकारच्या राज्यकारभाराचं तत्वज्ञान राहिलेलं आहे, अशा शब्दात युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.

मोदी सरकारच्या राजवटीत लोकशाही संस्था उध्वस्त करण्यात आल्या. विरोधकांना जेरीस आणण्यात आलं. लोकशाही मुल्यांना हरताळ फासण्यात आला, असे वार सोनिया गांधांनी मोदी सरकारवर केले. त्या काँग्रेस पक्षाच्य़ा संसदीय बैठकीत बोलत होत्या.

मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात राज्यघटनेतील मुल्ये आणि तत्वे सत्ताधाऱ्यांनी पायदळी तुडवली, असंही सोनिया म्हणाल्या.

दरम्यान, लोकसभा निवडणुक अगदी तोंडावर येऊन ठेपलीय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबरोबरच सोनिया गांधींनी देखील आपल्या टीकेची धार अधिकच मजबुत केल्याचं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या-

‘RSS हा बेलागम घोडा’, प्रकाश आंबेडकरांची मालेगावच्या सभेत ‘RSS’वर सडकून टीका

होय, मी राज ठाकरेंची भेट घेतली… भेट घेण्यात गैर काय?- अजित पवार

मोदी हटाव देश बचाव; ममता बॅनर्जींचा नवा नारा

शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार; बैठकीत शिक्कामोर्तब

अजित पवार आणि राज ठाकरे यांची लोकसभा निवडणूक समोर असताना मुंबईत भेट

Google+ Linkedin