पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आता ‘ती’ हिंमत उरली नाही!

नवी दिल्ली | कुठलंही ठोस कारण नसताना संसदेचं हिवाळी अधिवेशन सरकारनं रखडवून ठेवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदेला सामोरं जाण्याची हिंमत नाही, असं यावरून दिसतंय, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलीय.

मोदी सरकारच्या अहंकारामुळे संसदीय लोकशाहीचं नुकसान होत आहे. लोकशाहीच्या मंदिराला कोणी टाळं ठोकण्याचा विचार करत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. घटनात्मक जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रकार आहे, असंही त्या म्हणाल्या.

केंद्र सरकार हिवाळी अधिवेशन घेण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप आहे या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.