बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देशाची संपत्ती विकणं चुकीचं’; सोनिया गांधींचा नरेंद्र मोंदींवर निशाणा

मुंबई | देशाच्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशाची संपत्ती विकणं चुकीचं, असं म्हणत सोनिया गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे. सोनिया गांधी यांनी द हिंदू या वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिला आहे. या लेखातून त्यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.

ज्या प्रकारे सरकारनं नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घाईगडबडीत घेतला होता त्याच प्रमाणे सरकार आता सरकारी संपत्तींच्या विक्रीचा निर्णय घेत आहे. सरकारनं घाईगडबडीत निर्णय घेण्यापासून वाचलं पाहिजे, असं सोनिया यांनी म्हटलंय.

एनपीएवरूनही सोनिया गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. या सरकारच्या कार्यकाळात देशाचा पैसा घेऊन पलायन करणाऱ्या लोकांची संख्या वेगानं वाढली आहे. हे सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं खासगीकरण करू पाहत आहे, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पुढचा विचार करून नोटबंदीमुळे देशाच्या जीडीपीमध्ये 2 टक्क्यांची घरसण होईल असं संसदेत म्हटलं होतं. पण त्यांचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे नाकारला, असं सोनिया गांधी यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ महिलेने स्वत: अंगातील झगा काढला; अनिल देशमुखांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात नेमकं काय घडलं!

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!

देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा

Renault Kiger गाडीचा बाजारात धुमाकूळ; पहिल्याच दिवशी झाली विक्रमी विक्री

कोरोना पाठोपाठ अमरावतीत ‘या’ आजाराचा शिरकाव!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More