बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आज सत्य, न्याय व अहिंसेचा विजय झाला आहे”

नवी दिल्ली |  देशातील शेतकऱ्यांना सुखद धक्का देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त ठरलेले सुधारित तीन कृषी कायदे सरकार मागे घेत असल्याची घोषणा केली. सरकारने हे कायदे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व देशाच्या हितासाठी तयार केले होते, असं मोदी म्हणाले. सरकार शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडल्याचं सांगत मोदींनी जनतेची माफी मागितली.

सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या निर्णयावर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. हा शेतकऱ्यांच्या बलिदानाचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 12 महिन्यांच्या गांधीवादी आंदोलनानंतर आज देशाच्या 62 करोड शेतकऱ्यांच्या संघर्षाचा व इच्छाशक्तीचा विजय झाला असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या.

आज सत्य, न्याय व अहिंसेचा विजय झाला आहे. न्यायाच्या या लढ्यासाठी 700 हून अधिक कुटुंबातील सदस्यांनी बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान आज सार्थकी लागल्याचं देखील सोनिया म्हणाल्या. लोकशाहीत कोणताही निर्णय घेताना विरोधकांशी सल्लामसलत करूण घेणं गरजेचं आहे.

मोदी सरकारने यातून भविष्यासाठी काहीतरी धडा घेतला असेल अशी मला आशा वाटते, असा टोला सोनिया गांधींनी मोदी सरकारला लगावला. शेतकऱ्यांविरोधात सरकारने रचलेलं षडयंत्र आणि हुकुमशाही राज्यकर्त्यांचा अहंकार दोन्ही पराभूत झाले आहेत, अशा तीव्र शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सरकारचा शेतीवर हल्ला करण्याचा कट फसला असून अन्नदाता विजयी झाला असल्याचं देखील त्या म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या

“‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांच्या कौतुकाचे ट्विट करावे”

काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसमधील ‘हे’ तीन मंत्री देणार राजीनामा

Netflix वापरताना मोबाईल डेटा संपतोय? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा आणि मोबाईल डेटा वाचवा

“झुकता है तानाशाह झुकानेवाला चाहिये”

“आता निवडणुकांमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागल्याने कृषी कायदे मागे घेतले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More