बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलाचं अफेअर, सुनेचं डिप्रेशन, नातसूनेचे अर्धनग्न फोटो; राणीच्या घरातील 5 वादग्रस्त गोष्टी

नवी दिल्ली | ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ IIचं वृद्धापकाळाने निधन झालं. 96 वर्षीय क्विन एलिजाबेथ गेल्या 70 वर्षांपासून ब्रिटनच्या महाराणी होत्या.

या मोठ्या कारकिर्दीत क्विन एलिजाबेथच्या प्रतिमेवर कोणताही डाग पडला नाही. पण हो, याच काळात राजघराण्यात तेढ आणि दुरावा निर्माण झाला. याच काळात एलिजाबेथ राणीच्या घरातील 5 वादग्रस्त गोष्टी चर्चेत पण आल्या.

1. मुलाचं अफेअर

24 फेब्रुवारी 1981 साली राजघराण्याने 32 वर्षीय प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाची घोषणा केली होती . राणीचा मोठा मुलगा चार्ल्सची पत्नी त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान होती. नाव होतं डायना स्पेन्सर. राजकुमारी डायना म्हणजे राजघराण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि जवळपास सगळ्यांच्याच स्मरणात असलेली राजकुमारी.  मात्र, यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे प्रिन्स चार्ल्सचं अफेअर. डायनाला लग्नापूर्वीच याची माहिती होती. तिला चार्ल्सशी लग्न करायचं नव्हतं, पण डायना करू शकली नाही, अशी चर्चा अजूनही होते. लग्नाच्या 11 वर्षांनंतर दोघे वेगळे झाले.

प्रिन्स चार्ल्सने डायनाशी लग्न केल्यावर कॅमिला पार्करला डेट करायला सुरुवात केली. त्यांच्या नात्यामुळे राजघराण्यात तणाव निर्माण झाला. क्विन एलिजाबेथने चार्ल्सला समजावून सांगितले पणकाही उपयोग झाला नसल्याचं म्हटलं जातं. 31 ऑगस्ट 1997 रोजी प्रिन्सेस डायनाचा पॅरिसमध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. यानंतर चार्ल्स आणि कॅमिला 1999 पासून पुन्हा भेटू लागले. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी एप्रिल 2005 मध्ये लग्न केले.

2. सुनेचं डिप्रेशन

1992 मध्ये डायना: हर ट्रू स्टोरी नावाचं एक पुस्तक आलं. त्यात प्रिन्सेस डायनाचे तुटलेले लग्न, प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला यांचं अफेअर आणि डायनाचं डिप्रेशन या सर्व गोष्टी होत्या. या पुस्तकाच्या रूपाने राणीच्या घरातल्या पडद्यामागच्या गोष्टी लोकांच्या हाती लागल्या. यानंतर स्वत: क्विन एलिजाबेथने हे अत्यंत वाईट वर्ष असल्याचे सांगितले होते.

3. नातसूनेचे अर्धनग्न फोटो

प्रिन्सेस डायनाचा मोठा मुलगा प्रिन्स विल्यम्सची पत्नी केट मिडलटनचा टॉपलेस फोटो 2012 मध्ये एका फ्रेंच मॅगझिनमध्ये छापून आला होता. या घटनेमुळे राजघराण्याला राग आला. यानंतर स्वतः प्रिन्स विल्यम्सनं हे दुःखद असल्याचे सांगितलं होतं. या प्रकरणी मासिकाशी संबंधित 6 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

4. डायनाचा धाकटा मुलगा हॅरी पत्नीसाठी राजघराण्यापासून वेगळा झाला

प्रिन्सेस डायनाचा धाकटा मुलगा प्रिन्स हॅरीची पत्नी मेघन मार्कल एक फिल्म स्टार होती आणि ती गैर-ब्रिटिश होती. ती हॅरीची आई डायनासारखी जगली. तिच्या जीवनशैलीमुळे मेघनला राजघराण्याच्या रोषाला सामोरे जावे लागले. यामुळे हॅरी त्याच्या कुटुंबापासून दूर होता.

हॅरी पत्नी मेघनसह 9 जानेवारी 2020 रोजी राजघराण्यापासून वेगळा झाला. तो ब्रिटनमधून अमेरिकेत गेला. राजघराण्यापासून वेगळं होणं हा खूप कठीण अनुभव असल्याचं प्रिन्स हॅरी आणि मेघन यांनी एका मुलाखतीत सांगितलं. एलिजाबेथ राणीच्या काळातील या घटनेची सोशल मीडियावर पण खूप चर्चा झाली.

5.  अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळामुळे प्रिन्स अँड्र्यूला पदवी सोडावी लागली

प्रिन्स अँड्र्यूवर अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. 2019 मध्ये हे प्रकरण उघडकीस आलं आणि याला ‘एपस्टाईन स्कँडल’ असं म्हटलं गेलं. या वादानंतर प्रिन्स अँड्र्यू यांना दिलेली ड्यूक ऑफ यॉर्क ही पदवी काढून घेण्यात आली होती. त्याला त्याच्या नावासोबत हिज रॉयल हायनेस वापरण्याचा अधिकार नव्हता.

एलिजाबेथ राणीच्या शाही परिवाराची या प्रकरणामुळे बरीच नाचक्की झाली होती.

Tags :

Queen Elizabeth young, चार्ल्स कुले, Age of Queen Elizabeth 2, Queen Elizabeth age, राष्ट्रकुल संघटना, Queen Elizabeth 1 age, Elizabeth I age, queen elizabeth age, queen elizabeth health, queen elizabeth 2022, queen elizabeth hospital, queen elizabeth sister, queen elizabeth father

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More