बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनूने कहर केला, 13 मुलांना नादी लावून लग्न केलं अन्…

नंदुरबार | मध्यंतरी एक गाणं प्रसिद्ध झालं होतं ‘सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का?’, असे त्या गाण्याचे बोल होते. मात्र एका सोनूने अखेर खरच विश्वासघात केल्याची घटना नंदुरबार येथून समोर आली आहे. संबंधित घटनेतील महिलेचं नाव सोनू शिंदे असं असून सोनूने चक्क 13 तरुणांशी लग्नगाठ बांधली आहे.

सोनू आणि तिची टोळी ही मुळची हिंगोली आणि अकोला येथील आहे. सोनूची टोळी सोनूचं लग्न वेगवेगळ्या तरुणांसोबत जुळवण्यासाठी विविध शहरांमधील दलालांची मदत घेत असते. यादरम्यान औरंगाबाद येथील एका दलालाने सोनूचं लग्न नंदुरबार येथील तरुणासोबत जुळवलं. लग्नाच्या आधी वधू पक्षाने नवऱ्याकडे काही लाखांची मागणी केली होती. तसेच मुलाकडच्या लोकांनी सोनू त्यांना पैसे देखील दिले.

दोन अठवड्यांपुर्वी सोनूचं नंदुरबार येथील तरुणासोबत लग्न पार पडलं. मात्र लग्नानंतर लगेचच सोनू तिथून पळून गेली. नवीन नवरी घरातून पळून गेल्याचं समजताच आपण लोबाडले गेलो आहोत हे नवरदेवाकडच्या लोकांच्या लक्षात आलं. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. ही माहिती समजताच पोलिसांनी तपास चालू केला. तपास करत असताना सोनू आता शिंदखेडा तालुक्यातील एका तरुणाशी 13वं लग्न करत असल्याचं समोर आलं.

दरम्यान, आपल्या बद्दल पोलिसांना भनक लागली असल्याचं सोनूच्या टोळीला समजताच सर्वांनी मिळून लग्नाचं ठिकाण बदललं. मात्र याबद्दल देखील पोलिसांना सुगावा लागला आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सोनूची आई आणि भावाने पळ काढला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसेच सोनूने 13 तरुणांसोबत लग्न केलं असून त्यांना लुटलं असल्याचं देखील समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र आणि केरळला गुजरातपेक्षा जादा मदत करावी- सुब्रमण्यम स्वामी

“मविआ सरकारच राज्याला लागलेला कोरोना म्हटलं तर राऊतांना आवडेल का?”

“….नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या”

सकारात्मक बातमी | 101 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात

“आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More