पुण्यातील लाइव्ह कार्यक्रमात सोनू निगमला त्रास, नेमका कोणता आजार झालाय?

Sonu Nigam

Sonu Nigam | सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांना पुण्यातील एका संगीत कार्यक्रमादरम्यान अचानक तीव्र पाठदुखी आणि स्नायूंमध्ये आकडीचा त्रास जाणवला. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या आरोग्याविषयी माहिती दिली आहे. यानंतर त्यांच्या या आजारबद्दल नवीच चर्चा होऊ लागली आहे. मात्र नेमका काय आहे हा आजार?

स्नायूंची थकवा-चुकीच्या हालचालींमुळे त्रास

शरीरातील स्नायूंना थकवा, पाणी कमी होणे, अपुरी हालचाल, चुकीच्या पद्धतीने बसणे, अयोग्य वॉर्म-अप आणि इलेक्ट्रोलाइटच्या असंतुलनामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. या कारणांमुळे अचानक स्नायूंमध्ये आकडी येण्याची शक्यता असते. सोनू निगम यांनीही यासारख्याच लक्षणांचा उल्लेख करत आपल्याला पाठीत तीव्र वेदना जाणवली आणि सरळ उभं राहणं कठीण झालं, असं सांगितलं आहे.

जर तुम्हालाही सतत पाठदुखीचा त्रास होत असेल तर सुरुवातीला स्ट्रेचिंग, पुरेसे पाणी पिणे, योग्य मसाज आणि औषधोपचार सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, वेदना कमी न झाल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

फायब्रोमायल्जियामुळे पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता

जर तुम्हाला सातत्याने पाठदुखी, मानेचा ताण, कंबरदुखी किंवा सांधेदुखी जाणवत असेल आणि उपचार करूनही आराम मिळत नसेल, तर हे फायब्रोमायल्जिया या आजाराची लक्षणे असू शकतात. फायब्रोमायल्जिया हा एक क्रॉनिक विकार असून तो मस्क्युलोस्केलेटल सिस्टमवर परिणाम करतो. या आजारामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांत वेदना आणि स्नायूंमध्ये असह्य ताण जाणवतो.

या विकाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आनुवंशिकता, संक्रमण किंवा शारीरिक व मानसिक तणाव यामुळे हा त्रास वाढू शकतो. विशेषतः महिलांना, कुटुंबात ही समस्या असलेल्या लोकांना किंवा नैराश्य आणि चिंता असलेल्या लोकांना फायब्रोमायल्जियाची शक्यता अधिक असते. याचे प्रमुख लक्षणांमध्ये थकवा, झोपेच्या समस्या, डोकेदुखी, एकाग्रता कमी होणे आणि स्मरणशक्तीमध्ये बिघाड होणे यांचा समावेश होतो.

English Title: Sonu Nigam Suffers Pain During Pune Concert Reasons

छावा सिनेमाची बॉक्स ऑफीसवर मोठी डरकाळी, कमाईचे आकडे ऐकून थक्क व्हाल

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या जीवाला धोका, संभाजी भिडे यांच्या विरोधात थेट पोलिसात धाव

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .