बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनमध्ये सोनू सूद आणि चंदीगडच्या नीतीने ९० हजार मजुरांना पोहोचवले घरी…

चंदीगड | सध्या ‘मदत’ या शब्दाला समानार्थी सोनू सूद हा शब्द आहे, ते वेळोवेळी सिद्ध झालं आहे. गरजूंना मदतीच्या बाबतीत सोनू सूदने कोणतीच कसर ठेवलेली नाही. चंदीगडच्या नीती गोयल आणि सोनू सूद यांनी मिळून ९० हजार मजुरांना घरी पोहोचवण्यात मदत केली आहे.

नीतीने सांगितले, मे महिन्याच्या सुरवातीला मी आणि सोनू गरजूंना जेवण देण्याचे काम करत होतो. त्याच दरम्यान मुंबईच्या रस्त्यांवरून आपल्या गावाला जाणारे मजूर पाहिले. त्यांच्याशी संवाद साधल्यावर समजले की, आपल्या गावाला ते चालत निघाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही १० बसची व्यवस्था करून मजूरांना घरी पोहोचवले. त्याच दरम्यान रमजानच्या महिन्यात आम्ही २५ हजार लोकांना अन्न पोहोचवण्याचे काम केले.

टाळेबंदी लागू होण्याच्या एक आठवडा आधीच गरजूंसाठी जेवण तयार करण्याचे काम चालू केले होते. १२०० गरजूंना अन्न पोहोचवण्यापासून झालेली सुरुवात आता ४५ लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. यानंतर आम्ही गरजूंना घरी पोहोचवण्याचे काम हाती घेतले. आम्ही या मदतीचे काम ‘लाला भगवानदास ट्रस्ट’ अंतर्गत केले.

आमचे कार्य पंजाबमध्येही चालू आहे. पंजाबमधील ज्या गावात शाळा नाही, तिथे नवीन शाळा उभारण्याचे काम चालू आहे. तसेच काही गावात मृतदेह ठेवण्यासाठी सोयी नाही, तिथे फ्रीजर उपलब्ध करून दिले आहेत. नीती गोयल यांचे सोनू सूद यांच्याबरोबर कौटुंबिक नाते आहे. नीती यांचे स्वतःचे मुंबईत Keliba, Madras Diaries, Ostaad आणि Nom Nom Bandra असे ४ रेस्टॉरंट आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More