मनोरंजन

वाढदिवसानिमित्त सोनू सूदने केली मोठी घोषणा; 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या जन्मभूमीत पाठवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करण्यापर्यंत सर्व समाजकार्य सोनू सूदनं केली आहेत. आज सोनू सूद त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण वाढदिवसाला सोनू सूदनं स्थलांतरित मजुरांसाठी मोठी घोषणा केली आहे.

सोनूने स्थलांतरित मजुरांसाठी ‘प्रवासी रोजगार.कॉम’ ही वेबसाईट सुरू केली आहे आणि त्यातून तो 3 लाख मजुरांना नोकरी देणार आहे.

माझ्या वाढदिवसाला स्थलांतरित बांधवांसाठी 3 लाख नोकरी देण्यासाठी PravasiRojgar.comचा माझा संकल्प… या नोकरींत तुम्हाला PF, ESI आणि अन्य सुविधाही मिळणार आहेत, असं ट्विट सोनू सूदने केलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. सोनू सूद बेरोजगार तरुणांना नोकरी देणार आहे. त्याची ही वेबसाईट कोणतही शुल्क आकारत नाही. या वेबसाईटवर 450 कंपन्या नोकरी देणार आहेत आणि आतापर्यंत 1 लाख लोकांना नोकरी दिली गेली आहे. अधिक माहितीसाठी 1800 121 664422 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील रूग्णालयात दाखल

सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले….

‘महिलांची सुरक्षा पूर्णपणे देवाच्या भरवशावर आहे’; बडनेरातील घटनेवरून चित्रा वाघ यांचं सरकारवर टीकास्त्र

लवासा ताब्यात घेऊन तिथे ‘कोविड सेंटर’ सुरू करा- गिरीश बापट

काळजी करू नका, पुण्यावर अजित दादांचं लक्ष आहे- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या