बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनू सूद दोन गावांसाठी ठरला आदर्श, रस्ता तर बांधून दिलाच पण मजुरांसाठी घर देऊन राहण्याचा प्रश्नही सोडवला!

नवी दिल्ली | काही महिन्यांपासून प्रत्येक गरजूच्या मदतीसाठी सोनू सूद धावून जात आहे. परदेशातील भारतीय नागरिकाला त्याच्या घरी पोहोचवले आहे. तसेच नुकतेच मजुरांसाठी घर देऊन त्यांचा राहण्याचा प्रश्नही सोडवला आहे.

 

 

सोनू सूदच्या कामाने प्रभावित होऊन दोन गावांनी आपल्या पायावर उभे राहण्याचे ठरवले आहे. आंध्रप्रदेशच्या विजयानगरम मधील दोन गावांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाकडून २००० रुपये घेऊन गावात रस्ता बनवला. रस्ता बांधण्यासाठी एकूण २० लाख रुपये गोळा झाले.

 

 

ट्विटरवर कृष्णमूर्ती नावाच्या व्यक्तीने ट्विट करून माहिती दिली. त्यात लिहिलंय,”सोनू सूदकडून प्रेरणा घेऊन आंध्रप्रदेशच्या विजयानगरम मधील दोन गावांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला. हे गाव टेकडीवर असल्याने गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याची गरज पडते.”

पुढे त्या ट्विटमध्ये लिहिलय,”१९४७ पासून स्थानिक सरकारकडे रस्ता बनवण्यासाठी विनंती केली होती, पण त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाने २००० रुपये देऊन रस्ता तयार करण्याचे ठरवले.” यावर सोनू सूदने याने देश बदलत आहे, असं ट्विट केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

“राहुल गांधींचे खच्चीकरण जेवढे भाजपने केले नाही तेवढे पक्षांतर्गत कोंडाळ्याने केले”

पुण्यात जम्बो सेंटरनंतर सर्व सुविधायुक्त दुसरे मोठे कोविड सेंटर, शुक्रवारी लोकार्पण

मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा, 7 मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची गर्जना

20 वर्षांनंतर लियोनेल मेस्सी बार्सिलोना क्लब सोडणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More