बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परदेशातील व्यक्तीलाही दिला सोनू सूदने मदतीचा हात; केलं ‘हे’ कौतुकास्पद काम

नवी दिल्ली | कोरोना संसर्गामुळे अनेक लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. तसंच, खूप लोक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात स्थलांतर करण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. अशावेळेस प्रशासनाच्याही नाकी नऊ आले असताना स्थलांतरित लोकांची मदत करण्यासाठी देवदूत बनून आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने स्वतःच्या खर्चाने लोकांना आपल्या इच्छितस्थळी पोहचवलं होतं.

सोनू सूदच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. सोनू सूद याला तेव्हापासून लोक काहीही अडचण आली तरी ट्विट करून किंवा मेसेज करून कळवू लागले आणि अशाप्रकारे तो सामाजिक जबाबदारी म्हणून लोकांची मदत करत होता. फक्त भारतातील लोक आत्तापर्यंत सोनूला मदतीची हाक मारत होते. परंतु, आता मात्र मधु पौडल या नेपाळी तरुणाने ट्विट करत आपल्याला मदत करण्याची विनंती सोनू सूदला केली आहे.

गेल्या दहा वर्षापासून एका दुर्मिळ आणि गंभीर आजाराने आपण त्रस्त असून दहावीत शिकत असताना या आजारामुळे मला शिक्षण सोडावं लागलं असल्याचं त्याने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या आजारामुळे नीट चालता न येणाऱ्या तरुणाला दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया हा एकच पर्याय शिल्लक असल्याचं सांगितलं होतं.

हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला शस्त्रक्रिया करणं शक्य नसल्याचं त्याने सांगितलं आणि मदत करण्याचं आवाहन सोनू सूदला केलं आहे. सोनू सूदनेही त्याला रिप्लाय देत “अतिथी देवो भव: आता विना काठी तू पळत नेपाळला जाशील” अशा आशयाचं ट्विट करून त्याला मदत करण्यासाठी तो पुन्हा पुढे सरसावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सर्व पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा’; निवडणूक आयोगाचा आदेश

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

…अन् लेकीचं शीर कापून तो थेट पोलीस ठाण्याकडे निघाला; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले

“मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झालं”; ‘ग्लोबल फ्रिडम’चा अहवाल

‘कल हो ना हो’ मधील जियाला ओळखणं झालंय कठीण, पाहा आता कशी दिसते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More