Top News महाराष्ट्र मुंबई

महापालिकेकडून आरोप होत असताना सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट, चर्चांणा उधाण!

मुंबई | लॉकडाऊनपासून चर्चेत असलेला प्रसिद्ध अभिनेता सोनू सदूने राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. अचानक सोनूने भेट घेतल्याने अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

सोनूला बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवासस्थान बेकायदा असल्याची नोटीस आली आहे. गेल्या आठवड्यात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता, ज्याला बीएमसीने ऑक्टोबर 2020 मध्ये बजावलेल्या नोटीस आणि दिवाणी कोर्टाने बजावलेल्या आदेशाला आव्हान दिलं होतं

जुहू इथल्या शक्तीसागर या निवासी सहा मजली इमारतीचं हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलंय. ही इमारत सोनू आणि त्याच्या पत्नीच्या मालकीची असल्याची कुठलीही कागदपत्रं नसल्याचं पालिकेनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र ही भेट सदिच्छा असल्याचंही बोललं जात आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“ब्लॅकमेलशिवाय मुंडे आणखी काय बोलणार?, पण मी मरेपर्यंत लढेन”

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील- काँग्रेस

पहिल्या टप्प्यात 55 टक्के लाभार्थींना मिळणार लस!

मुंबईतील शाळा, कॉलेजची दारं जानेवारीच्या ‘या’ तारखेला होणार खुली???

“धनंजय मुंडे प्रकरणात सरकारवर कोणताही दबाव नसून मुंडेंवरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या