Top News मनोरंजन

‘मतदान बोटाने नाही तर…’; सोनू सूदचा बिहारच्या लोकांना मोलाचा सल्ला

मुंबई | बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्यात 71 जागांसाठी मतदान होणार आहे. अशातच अभिनेता आणि गरजुंना मदतीचा हात देणाऱ्या सोनू सूदने बिहारच्या जनतेला मतदान करताना मोलाचा सल्ला दिला आहे.

ज्या दिवशी बिहारमधील नागरिकांना कामासाठी इतर राज्यांत जावं लागणार नाही. उलट काम मिळवण्यासाठी इतर राज्यांतील लोक बिहारमध्ये येतील तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल, असं सोनू सूदने म्हटलं आहे.

वोटिंग मशीनचं बटण दाबताना बोटाचा नाही तर  मेंदूचा वापर करा, असा सल्ला सोनूने बिहारच्या जनतेला दिला आहे. सोनू सूदचं हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

दरम्यान, सोनू सूदचं म्हणणं तसं योग्यच आहे. कारण बिहारमधील तरूणवर्ग रोजगारासाठी इतर राज्यात जातात. त्यामुळे बिहारमध्येच या तरूणवर्गाला काम मिळालं तर खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल.

 

महत्वाच्या बातम्या-

‘…म्हणून पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली’; पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा

खळबळजनक! मनसे नेत्याची तलवारीने वार करून हत्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार!

“शुगर वाढली की राणे काय बोलतात, ते त्यांनाच कळत नाही”

मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो, अशी चूक पुन्हा होणार नाही- जान कुमार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या