“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र व्यक्ती”
मुंबई | लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी देवदूत ठरलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड’ ने सन्मामित करण्यात आलं. यावेळी बोलताना सोनूने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आपलं मत व्यक्त करताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.
सोनू सूदच्या मुंबईतील महापालिका हॉटेलवर कारवाई केली होती. त्यावेळी त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्या भेटीचा अनुभव सोनूने सांगितला आहे. हा अनुभव सांगताना त्याने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
राज्याचा मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संंधी ही माझ्यासाठी खरच चांगली गोष्ट होती. आदित्य ठाकरेंनी माझं स्वागत केलं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र आहेत. उद्धव ठाकरेंना भेटून खूप सकारात्मकता मिळाली मी हे अनेकदा सांगत आलो असल्याचं सोनू म्हणाला. यावेळी त्याने त्याच्या हॉटेलवर झालेल्या कारवाईबाबतही भाष्य केलं.
माझ्या हॉटेलवर झालेली कारवाई मला मान्य आहे जे चुक आहे ते चुक पण मी अनधिकृत बांधकाम केलेलं नाही. गेल्या 22 वर्षापासून ती इमारत तशीच होती त्याची खिडकीसुद्धा बदलली नसल्याचं सोनूने हॉटेलवर झालेल्या कारवाईबाबत बोलताना सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश
‘मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा”
महाराष्ट्रातील आवडता नेता कोण?, सोनू सूद म्हणाला…
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात फेरबदल?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं मंत्रिपद धोक्यात
‘राज्यात भाजपचं सरकार आल्यावर….’; नरेंद्र मोदींनी बंगालच्या जनतेला दिला शब्द
Comments are closed.