Top News देश मनोरंजन

सोनूचे पाऊल पडते पुढे….. १ लाख प्रवासी मजुरांना नोकरी देण्याचं आश्वासन!

नवी दिल्ली | टाळेबंदी झाल्यापासून सोशल मीडियावर सोनू सूद हे नाव कायम चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच आहे, प्रत्येक गरजूला मदत करण्याचे काम सोनू सूदने केले आहे. मग तो विदेशात अडकलेला भारतीय असो किंवा टाळेबंदी दरम्यान अडकून पडलेले प्रवासी मजूर. सोनू सूदने १ लाख प्रवासी मजुरांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.

 

 

सोनू सूदने APEC (Apperal Export Promotion Council) सोबत करार केला आहे. या कंपनीअंतर्गत सोनूने १ लाख प्रवासी मजुरांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. सोनू सूदने ट्विट करून माहिती दिली. त्यात लिहिलंय, “इच्छा तेथे मार्ग..! माझ्या प्रवासी बांधवांसाठी मी आता APEC सोबत करार केला आहे. pravasirojgar.com या माध्यमातून देशभरात ‘Apperal Manufacturing and Export Company’ मध्ये १ लाख नोकऱ्या देण्याचे वचन. धन्यवाद, जय हिंद.”

APEC चे अध्यक्ष सकतीवेल हे इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना म्हणाले,”आमच्या समितीने सोनू सूदला विनंती केली की, सध्या निर्यातीची मागणी वाढल्याने तातडीने  एक लाख कामगारांची गरज आहे. जुन महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये चांगली स्थिती आहे. ऑगस्टमध्ये ही परिस्थिती अजून सुधारेल आणि तेव्हा आम्हाला नविन ऑर्डर भेटतील. आम्हाला असं वाटतंय की, टाळेबंदीमध्ये सोनूने प्रवासी कामगारांची मदत केली होती. त्यांचे ते नक्की ऐकतील.”

 

 

सोनू सूदने त्याच्या वाढदिवसानिमित्त pravasirojgar.com या माध्यमातून ३ लाख नोकऱ्या देण्याचे वचन दिले होते. चांगला पगार, पीएफ, ईएसआय आणि अन्य सुविधा उपलब्ध आहे. AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co, Portea आणि बाकी सर्वांना धन्यवाद देतो, असं सोनू सूदने ट्विट करून सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र-बिहार तुलना करणाऱ्या सुशील कुमार मोदींना सचिन सावंतांनी झापलं

….अन्यथा 10 तारखेपासून आम्ही रस्त्यावर उतरणार, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा

“कोरोनाचा प्रादुर्भाव डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये पसरतोय, तो रोखणं गरजेचे त्यासाठी…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.