बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर बुडवल्याच्या आरोपावर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद कोरोना लाॅकडाऊनच्या काळात प्रचंड चर्चेत आला होता. स्थलांतरित कामगारांना मदत करुन सोनू सूदने लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. मात्र आयकर विभागाने सोनूवर कर बुडवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर सोनूने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सोनूने इन्स्टाग्राम तसेच ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टला कठीण रस्त्यांवर देखील प्रवास सोपा वाटतो तसेच प्रत्येक भारतीयांच्या प्रार्थनेचा परिणाम होतोय असं वाटतय, असं कॅप्शन दिलं आहे.

सोनूने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दर वेळी तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची गरज नसते, वेळ सगळं सांगते, असं सोनूने म्हटलं आहे. मी भाग्यावान आहे की मला भारतातील गरजू लोकांना मदत करण्याची संधी मिळाली. तसेच माझ्या फाऊंडेशनमधील प्रत्येक रुपया मौल्यवान जीव वाचवण्यासाठी आणि गरजू लोकांसाठी असल्याचं सोनूने म्हटलं आहे.

दरम्यान, या संपुर्ण पोस्टच्या खाली सोनूने कर भला, हो भला, अंत भले का सब भला, असं लिहिलं आहे. सोनूने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी तसेच अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

पाहा पोस्टः 

थोडक्यात बातम्या-

किरीट सोमय्यांचा हा दौरा म्हणजे केविलवाणा तमाशा- अमोल मिटकरी

‘कोरोनाला संपवण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक’, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

“…तर दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालेलं असेल”

‘मुख्यमंत्री तुम्ही भगवा सोडून हिरवा धारण करा पण…’, सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पुण्यातील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, तिथं चाललेला प्रकार पाहून पोलिसही हादरले!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More