बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलग दुसऱ्या दिवशी सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचा छापा!

मुंबई | कोरोना काळात गरिबांचा मसीहा बनलेला अभिनेता सोनू सूदच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. काल सोनू सूदच्या घरी आयकर विभागानं छापे टाकले होते. तब्बल 20 तास आयकर विभागानं त्याच्या घराची झाडाझडती केली. यातच आता सलग दुसऱ्या दिवशीही सोनूच्या घरी आयकर विभागाची टीम दाखल झाल्याचं समजतंय.

बुधवारी आयकर विभागानं केलेल्या छापेमारीत सोनू सूदच्या घरातून काहीही कागदपत्र किंवा वस्तू जप्त केले नाहीत. मात्र आता आजही पुन्हा त्याच्या घरी छापा टाकल्याचं समजतंय. त्यामुळे आता सलग दुसऱ्या दिवशी देखील सोनुच्या घरी आयकर टीम आल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

सोनू सूदच्या घराशिवाय त्याच्या सहा ऑफिसवरही आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यामुळे आता कोरोना काळात गरिबांची मदत केलेल्या सोनूला त्याच्या चाहत्यांच्या मदतीची गरज आहे.

दरम्यान, कोरोना काळात गरिबांचा मसीहा बनलेल्या सोनू सूदच्या घरी आयकर विभागानं छापा टाकल्यानंतर अनेकांच्या नजरा याकडे लागल्या आहेत.

थोडक्य़ात बातम्या –  

“कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?”

बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; धक्कादायक कारण आलं समोर

राज कुंद्रा प्रकरणात मोठी अपडेट; आता शिल्पा शेट्टी बनणार साक्षीदार

एयरोस्पेस कंपनीनं 9 वर्षांनी रचला इतिहास, पहिल्यांदाच सामान्य नागरिक झेपावले अंतराळात

मराठा सेवा संघ भाजपसोबत?, पुरुषोत्तम खेडेकरांच्या नव्या लेखानं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More