बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एखाद्या हिरोईन सोबत लग्न लावून दे ना’, चाहत्याच्या अजब मागणीला सोनू सूदचं भन्नाट उत्तर

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात अनेकांची मदत केली आहे. सध्या तो MTV चा सुप्रसिद्ध अशा Roadies Season 18 चे शूटिंग करत आहे. या शोचे शुटिंग सध्या दक्षिण आफ्रिकेत (South Africa) सुरू आहे. सोनू सूद प्रामुख्याने हिंदी, तेलगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करतो.

सोनू सूद सोशल मीडियावरही सक्रिय असतो. आजही तो लोकांना मदत पुरवत असतो. अनेक गरजू लोक मदत हवी असल्यास सोशल मीडियावर सोनू सूदकडे हक्काने मदत मागतात आणि तोही सढळ हाताने लोकांना मदत करतो. कोरोना काळात अनेकांचा मसिहा ठरलेल्या सोनूकडे एका चाहत्याने अजब डिमांड केली आहे. त्या चाहत्याच्या ट्वीटला (tweet) सोनूनं मजेशीर उत्तर दिलं आहे.

शुभम डाँन नावाच्या ट्विटर युझरने सोनूकडे एक अजब डिमांड केली.  भावा, प्लिज एका अभिनेत्रीसोबत माझं लग्न लावून दे… असं ट्विट त्या चाहत्याने केलं आहे. यावर सोनू सूदने भन्नाट रिप्लाय दिला आहे. तो म्हणाला हो तुझ्याशी लग्न करण्यासाठी सगळ्या हिरोईन्स कधीपासून मला विचारत आहेत. यावर काहींनी हस्यास्पद कंमेट केल्या आहेत.

दरम्यान, 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद’ या चित्रपटामधून (From the movie) सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘पृथ्वीराज’ हा सोनूचा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात सोनूसोबतच अक्षय कुमारनं देखील काम केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?, मुख्यमंत्री शिंदेंकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

श्रीलंकेत पुन्हा एकदा जाळपोळ, संतप्त नागरिक रस्त्यावर

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा, नारायण मुर्तींसोबत आहे खास नातं

“शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीसांनी दाढी-मिश्यासुद्धा लावल्या असतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More