बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कंगनाचा इंदिरा गांधी चित्रपट फ्लॉप होणार, कारण…”

मुंबई | अभिनेता केआरकेने नुकतंच अभिनेता सलमान खानला डिवचलं. सलमान आणि केआरकेमध्ये पुर्वी देखील वाद झाला होता. ज्याची केस अजून देखील कोर्टात चालू आहे. अशातच आता केआरकेने अभिनेत्री कंगना रनौतवर निशाणा साधला आहे. कंगना रनौतचा इमर्जन्सी चित्रपट फ्लाॅप होणार, असं केआरकेने म्हटलंय.

केआरकेनं कंगना रनौत विरूद्ध एक ट्विट केलं आहे. कमाल आर खाननं ट्विट केलं की मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकारप्रमाणे इमर्जन्सी चित्रपटही फ्लॉप होईल. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी इंदिरा गांधी आणि आणीबाणीवर इंदू सरकार हा चित्रपट बनवला होता आणि हा चित्रपट पाहण्यासाठीही कोणीही गेलं नव्हतं आता दीदी कंगना रनौत या विषयावर चित्रपट बनवत आहे.

यावरच न थांबता पुढे कंगना सलग 12 वा फ्लॉप चित्रपट देणार आहे. तिचे शेवटचे 11 चित्रपट सुपर फ्लॉप झाले आहेत, असं केआरके म्हणाला. केआरकेने जरी असं म्हटलं असेल तरी स्वत: कंगनानं दिग्दर्शित केलेल्या मणिकर्णिकानं 100 कोटींची कमाई केली होती.  2015 मध्ये तिच्या तनु वेड्स मनु रिटर्न्स या चित्रपटाने 243 कोटींची कमाई केली असून हा चित्रपट कंगनाचा आजपर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे.

आता केआरकेनं कंगनाच्या चित्रपटांना फ्लॉप म्हणून संबोधलं आहे. यावर कंगना कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं ठरेल. यापूर्वी पासपोर्ट प्रकरणावरुन केआरकेनं कंगनाची खिल्ली उडवली होती.

पाहा ट्विट:

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदींविरोधात बोलल्याने योगी सरकारने महसूल अधिकाऱ्याला केलं निलंबित!

“अर्णब गोस्वामीविरुद्ध हक्कभंग आणून खळबळ माजवणारे सरनाईक हतबल का झाले?”

मास्क न घालणं नवरेवाला पडलं महागात; पोलिसांनी दंड ठोठावत दिला कारवाईचा आहेर

रिझर्व्ह बँकेचा राजकारण्यांना झटका; घेतला हा मोठा निर्णय

संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?- प्रविण दरेकर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More