बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लवकरच महाराष्ट्रात बदल दिसेल, भाजपचं सरकार येणार”

मुंबई | राज्याच्या राजकारणात सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA Government) आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये (BJP) नेहमीच जोरदार वाद रंगलेला असतो. 2019 ला राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली होती. महाविकास आघाडीचा प्रयोग करून भाजपच्या हातातून सत्ता हस्तगत करण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली होती. तेव्हापासून भाजप नेत्यांनी (BJP Leaders) अनेकदा महाराष्ट्रात त्यांचं सरकार येणार अशा प्रकारची वक्तव्य केली आहेत.

अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार आहे, असा गौप्यस्फोट केला आहे. नारायण राणे सातत्यानं आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून खळबळ माजवत असतात. महाविकास आघाडीचं अस्तित्व जास्त काळ नसल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत. परिणामी नारायण राणे यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका कसा घ्यायचा? हा प्रश्न सध्या राजकीय जाणकारांना पडला आहे.

एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपीत ठेवाव्या लागतात, असं नारायण राणे म्हणाले आहेत. परिणामी नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारला पाडण्यासाठी चंग बांधला असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. लवकरात लवकर राज्यात बदल होणार आहे आणि तो तुम्हाला दिसेल, असंही राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, गत काही महिन्यांपासून नारायण राणे आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष वाढला आहे. सरकार भाजपसोबत कसलंही काम असेल तर भेदभाव करत आहे, असा आरोप नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

थोडक्यात बातम्या 

कोल्हापूरचा गडी बिनविरोध जिंकला! पाटील यांचा मार्ग मोकळा

“…मग संविधान पाळण्याचं नाटक कशासाठी?”, राऊतांचा खोचक सवाल

लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळले जोडप्याचे मृतदेह अन् उडाली खळबळ

“…तर त्याला बाॅक्सिंग रिंगमध्ये घेऊन चांगलाच झोडपला असता”

विलिनीकरण मान्य झालं नाही तर काय?, अनिल परब म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More