बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लवकर तुझा सिद्धू मुसेवाला करणार’; सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

मुंबई | पंजाब सरकारने गायक सिद्धू मुसेवाला यांच्यासह अनेक व्यक्तींची सुरक्षा काढून घेतली होती. सिद्धू मुसेवालाची सुरक्षा काढल्यानंतर एका दिवसात अज्ञात लोकांना गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यातच आता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला धमकीचे पत्र आले आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

‘मूसा वाला जैसा कर दूंगा, अशा धमकीचे पत्र सलमान खानचे वडिल सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला मिळाले आहे. सलमान खान ज्याठिकाणी वॉकला जातो तिथे हे पत्र आढळले आहे. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याने बॉलिवूडमध्ये एकचं खळबळ उडाली आहे. बांद्रा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सलमान खानला मिळालेल्या पत्रासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे. अभिनेता सलमान खान याला मिळालेले धमकीचे पत्र त्याचे वडिल सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकास मिळाले आहे. सलमान खान ज्याठिकाणी विश्रांतीसाठी थांबतो त्या बाकड्यावर हे पत्र आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सदर परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. या चिठ्ठीमागे कोण आहे हे शोधण्यासाठी स्थानिक लोकांची चौकशी देखील करण्यात येत आहे. सलमान खानला आलेल्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“पक्ष ज्यावेळेस एक नंबरचा होईल, मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार”

Rajyasabha Election| महाविकास आघाडीला दुसरा मोठा झटका

मोठी बातमी! करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या 55 जणांना कोरोनाची लागण

“महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना देखील आवडला असता”

“आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, शेंबड्या पोराला समजवतात तसं पडळकरांना समजवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More