मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर!

मुंबई। सध्या महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. छोट्या वस्तुपासून मोठ्या वस्तूपर्यंत महागाईने अक्षरशः कहर केलाय. त्यामुळे नागरिकांना कधी कोणता धक्का बसेल सांगता येत नाही.

मुंबईकरांसाठी (Mumbai) एक दिलासादायक बातमी समोर आली. मुंबईची जीवनवाहिनी लोकल नंतर मुंबईकरांचा मुंबईच्या बेस्ट बसवर जास्त विश्वास आहे.

मुंबई येथील बेस्ट बसची तिकिटं सर्वसामान्यांना परवडण्यासारखेच आहेत. पण या बेस्ट बसने करणाऱ्या प्रवाशांकरिता एक विशेष योजना असून या योजेनची घोषणा करण्यात आलीये. ती म्हणजे ‘बेस्ट चलो ऍप’ आणि ‘बेस्ट चलो कार्ड’ वापरणाऱ्यांसाठी ‘सुपर सेव्हर’चा प्लॅन आणलाय.

दरम्यान, एवढंच नव्हे तर आपल्या मुंबईकरांसाठी बेस्ट बस नेहमी नवनवीन उपक्रम राबवत असते. आणि त्यामुळे मुंबईकरांची बचत होणार आहे.

थोडक्यात बातम्या-