बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माफ करा तांत्रिक कारणामुळे आज इंधन दरवाढ झाली नाही; असुविधेसाठी दिलगीर आहोत”

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासुन पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्य माणुस मेताकुटीला आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच दररोज इंधनाच्या किंमतीत विक्रमी वाढ होत आहे. देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर इंधन दरवाढ थांबवण्यात आली होती. मात्र, निवडणुकांचे निकाल लागताच पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला कात्री बसायला सुरूवात झाली आहे.

केंद्र सरकारवर विरोधकांकडुन महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच काँग्रेस पक्षाकडुन केंद्र सरकारविरोधात आंदोलन देखिल करण्यात येत आहेत. माजी अर्थमंत्री व काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी ट्विट करत केंद्र सरकारसह पेट्रोलियम कंपन्यांना खोचक टोला लगावला आहे.

पी.चिदंबरम यांनी आज आपल्या अधिकृत अकाउंटवरून ट्विट करून आज 20 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही तांत्रिक कारणांमुळे वाढ करण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच इंधन दरवाढ न झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असं म्हणत त्या पोस्टमध्ये भारतीय पेट्रोलियम कंपन्यांचे लोगो पोस्ट केले आहेत.

सध्या चिदंबरम यांनी केलेल्या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच डोक्यावर घेतलं आहे, तसेच राजकीय वर्तुळातही त्यांच्या ट्विटची जोरदार चर्चा रंगली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. तसेच इंधन दरवाढीचा मुद्दा पेटला असताना पी.चिदंबरम यांच्या उपरोधिक ट्विटने चांगलाच हशा पिकवला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या महिलेला कोरोनाच्या दोन्ही व्हेरिएंटची लागण

पुण्यातील ‘त्या’ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट, नगरसेवकाचं नाव आल्यानं खळबळ

व्हॉट्सअप चॅटमधून राज कुंद्राच्या ‘या’ धक्कादायक गोष्टी आल्या समोर

मोदींचं मराठीत ट्विट; पांडुरंगाच्या चरणी केली ‘ही’ प्रार्थना

“काहीही न करता पैसे कसे कमवतो?”; राज कुंद्राच्या अटकेनंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More