बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

T-20 वर्ल्ड कपआधी सौरव गांगुलीचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला…

मुंबई | आजपासून टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेचा आज पहिला सामना सुरू होत असल्यामुळे भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच आता बीसीसीआयचे अध्यक्ष आणि  माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय संघाला विजयासाठी सल्ला दिला आहे.

आपण जर भारतीय संघाकडे पाहिले तर इथं जागतिक दर्जाचं कौशल्य दिसेलं. भारतीय संघातील खेळाडूंकडे कोणत्याही स्तरावर खेळताना धावा आणि बळी घेण्याची क्षमता आहे, असं सौरव गांगुली म्हणाला. तसेच त्यांनी तुम्हाला इतक्या सहजपणे चॅम्पियन होता येणार नाही. केवळ स्पर्धेत भाग घेतला म्हणजे विजेता होतं असं नाही, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

भारतीय खेळाडूंना टी-ट्वेन्टी विश्वचषक जिंकण्यासाठी मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेत परिपक्वतेने खेळण्याची गरज असल्याचं सौरव गांगुलीने म्हटलं आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्तवाखाली भारतीय संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार ठरेल, असं विश्वास सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे.

दरम्यान, अंतिम फेरी गाठल्यावरच तुम्ही विजेतेपद जिंकता येईल. भारतीय संघाने सुरूवातीपासून विजेते बनण्याचा विचार करू नये, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे. भारतीय संघाने एकाच वेळी एकाच सामन्याचा विचार करावा, असा सल्ला सौरव गांगुलीने दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

कांद्याचा भाव पुन्हा रडवणार, वाचा काय असेल नवीन दर?

‘भारताला हारव नाहीतर तुला पाकिस्तानात एन्ट्रीच नाही’; सामन्याआधी बाबर आझमला धमकी

राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागितली; ‘या’ मराठी चित्रपट दिग्दर्शकाला अटक

‘…तर समजून जावं नवरत्न तेलाने चंपी करण्याची वेळी आलीये’; मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर टीका

रामलीला सुरु असताना राम नामाच्या गजरात दशरथने मंचावरच सोडले प्राण, प्रेक्षकांना वाटला अभिनय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More