बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर….’; सौरव गांगुलीने दिला खास सल्ला

मुंबई | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिन सामना भारत आणि न्यूूझीलंड यांच्यात होणार आहे. सर्व क्रीडा प्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. भारताने आपल्या 11 शिलेदारांची यादी जाहीर केली आहे. मात्र अद्यापही न्यूझीलंड संघाने आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली नाही. अशातच या सामन्याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

अंतिम सामन्यात भारताच्या सलामीवीरांवर सामन्याची मदार असणार असून एका मजबूत ओपनिंग भागिदारीची गरज असल्याचं सौरव गांगुली यांनी म्हटलं आहे. माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याआधी जी कामगिरी चोखपणे पार पडत होता तशाप्रकारे अनुभवी रोहित शर्मा आणि युवा खेळाडू शुभमन गिल यांनी ही  जबाबदारी निभावणं गरजेचं असल्याचं सौरव गांगुली म्हणाला.

भारताने प्रथम फलंदाजी केली तर भारत मोठी धावसंख्या निर्माण करुन दबावमुक्त होऊ शकतो.  भारताकडे जे गोलंदाज आहेत ते 20 बळी घेण्याची क्षमता ठेवतात मात्र फलंदाजांनी 300 ते 500 धावसंख्या करायला हवी असं गांगुलीने म्हटलं आहे.

दरम्यान, भारतीय संघ- विराट कोहली कर्णधार , रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आला आहे. 2019 च्या विश्वचषकमध्ये सेमी फायनलचा वचपा काढण्यासाठी विराटसेना तयार झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘सर्वगुण संपन्न असला तरी…’ खंत व्यक्त करत शिल्पा शेट्टीने केला राज कुंद्राचा खुलासा

मूक आंदोलन सुरुच राहणार, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही – संभाजीराजे भोसले

‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या नावामुळे वातावरण तापलं, अक्षय कुमारचा पुतळा जाळत केली नारेबाजी

धक्कादायक! ‘या’ अभिनेत्रीच्या घरात होतं भूत, समोर आला चित्तथरारक प्रकार

चिंताजनक! महाराष्ट्रात बरे होणाऱ्यांची संख्या घटली; नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More