बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन तेंडुकरची BCCI एन्ट्री?; सौरव गांगुली म्हणतो…

मुंबई | भारतीय क्रिकेट (Indian Cricket) विश्वात सध्या अनेक वक्तव्य आणि खुलास्यांमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) कर्णधार पदावरून कमी केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. त्यात बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने नुकतीच एक मुलाखत दिली.

बॅकस्टेज विथ बोरिया (Backstage With Boria) या कार्यक्रमात बोलताना विराट कोहली याव्यतिरीक्त अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. क्रीडा पत्रकार बोरिया मजूमदार यांनी मुलाखतीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) भारतीय क्रिकेटमध्ये सेवा देण्यास तयार आहे का? असा प्रश्न विचारला.

‘सचिन हा पुर्णपणे वेगळा आहे. मला असं वाटतं की त्याला या सर्वात पडायचे नाही. पण इंडियन क्रिकेटमध्ये सचिनचा सहभाग यापेक्षा चांगली बातमी असू शकत नाही. सर्वात गुणवान प्रतिभेचा शोध घेणे आपल्याला सुरूच ठेवावे लागेल आणि एका स्तरावर सचिनही भारतीय क्रिकेटचा भाग होण्याचा मार्ग शोधेल’, असं उत्तर गांगुली याने दिलं आहे.

दरम्यान, ‘सध्या हितसंबंधाबाबत जगभरात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी तुमच्यावर प्रश्न निर्माण होतील’, असं वक्तव्य देखील सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सचिन तेंडुलकर बद्दल बोलताना केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

ST Employee Strike: ‘संप असाच सुरू राहिला तर…’; सरकार ‘या’ मोठ्या कारवाईच्या तयारीत

“आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते घाबरले, कार्यकर्ते बिथरले आहेत आणि….”

IRCTCची नवी सेवा, रेल्वे तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार परतावा

मोठी बातमी! पेपरफुटी प्रकरणात राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ‘या’ आठ जणांना मिळणार तिकीट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More