Top News खेळ

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल!

मुंबई | बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर सौरव गांगुलीची पुन्हा प्रकृती बिघडली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गांगुलीला मागेसुद्धा असाच त्रास झाल्याने रूग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. 7 जानेवारीला गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

ग्रीन कॉरिडोर बनवून सौरव गांगुलीला त्याच्या बेहला येथील घरापासून अपोलो रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं. अपोलो रुग्णालयात डॉ. आफताब खान यांच्या देखरेखीखाली गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, यााआधी गांगुलीला घरातील जिममध्ये व्यायाम करताना छातीत त्रास झाला होता. तेव्हा गांगुलीच्या शस्त्रक्रियेत  ब्लॉकेज काढण्यात आले होते.

थोडक्यात बातम्या-

“शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे”

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित घोषित करा- उद्धव ठाकरे

कर्तृत्वाला मिळाली नशिबाची साथ; सर्वात कमी वयाचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा!

आशिष शेलार भाजप आणि संघाचे गुलाम- अमोल मिटकरी

“शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या