खेळ

‘मला कर्णधार पदावरुन हटवण्यात ‘त्या’ सर्वांचा सहभाग’; गांगुलीचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली |  बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कर्णधार पदावरून झालेल्या वादावर मोठं भाष्य केलंय. भारतीय संघाचा कर्णधार असताना प्रशिक्षक ग्रेग चॅपल आणि गांगुली यांच्यातले मतभेद आणि अचानक कर्णधारपदावरुन दादाची हकालपट्टी हा घटनाक्रम सर्वांना माहिती असेल. आता यावर गांगुलीने मोठा खुलासा केलाय.

माझ्या आयुष्यातला तो सर्वात मोठा धक्का होता. कर्णधारपद काढून घेणं हा माझ्यावरचा अन्याय होता. प्रत्येक वेळी तुम्हाला न्याय मिळेल अशी मलाही अपेक्षा नव्हती, पण ज्या पद्धतीने मला वागवण्यात आलं ते टाळता आलं असतं. माझ्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 5 वर्ष घरच्या मैदानावर आणि परदेशात चांगली कामगिरी करत होता, आणि अचानक मला संघातून काढलं जातं?? पहिल्यांदा सांगण्यात आलं की मी वन-डे संघाचा सदस्य नाहीये. त्यानंतर कसोटी संघातूनही मला डावलण्यात आलं, असं गांगुलीने सांगतिलंय.

मला ग्रेग चॅपल यांना एकट्याला दोषी धरायचं नाही. त्यांनी या सर्व प्रकरणाला सुरुवात केली यात काही शंकाच नाही. चॅपल यात जितके दोषी आहेत तितकेच इतरही आहेत. एक परदेशी प्रशिक्षक भारतीय संघाच्या निवडीबद्दल एवढी महत्वाची भूमिका बजावू शकत नाही. संपूर्ण सिस्टीम माझ्याविरोधात असल्याशिवाय हे शक्य होणार नव्हतं. मला कर्णधारपदावरुन हटवण्यात सर्वांचा सहभाग होता, असं गांगुली म्हणाला आहे.

2005 साली भारतीय संघातून स्थान गमावल्यानंतर गांगुलीने पुन्हा 2006मध्ये टीममध्ये पुनरागमन केलं. दोन वर्षांच्या काळात आश्वासक खेळ करत 2008 साली गांगुली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबेचा एन्काऊंटर झाला, पण ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर कोण देणार आणि ती कधी मिळणार???

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय”

महत्वाच्या बातम्या-

कल्याण डोंबिवलीतही 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आला लॉकडाउन

“दुधात पडलेल्या माशीप्रमाणे अजिंक्य रहाणेला वन-डे मधून बाहेर काढलं”

“मुख्यमंत्र्यांची कामं पाहून देवेंद्र फडणवीसांचे डोळे पांढरे होतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या