Top News देश

“राजकारणात येण्यासाठी दबाव टाकल्याने सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका”

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बीसीसीयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला दोन दिवसांमागे हृदयविकाराचा झटका आला होता. आता गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. मात्र अशातच सीपीआयचे ज्येष्ठ नेते अशोक भट्टाचार्य यांनी गांगुलीच्या हृदयविकाराच्या झटक्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काहींनी राजकीय फायद्यासाठी सौरव गांगुलीला राजकारणात येण्यासाठी दबाव टाकला त्यामुळे त्याच्यावर दबाव आला असेल, असं अशोक भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.

मी माागील आठवड्यात सौरवला भेटलो होतो आणि त्यावेळी त्याला राजकारणाता येऊ नको असा सल्ला दिला असल्याचं भट्टाचार्य म्हणाले. त्यावेळी गांगुलीनेही मला विरोध केला नसल्याचं भट्टाचार्यांनी सांगितलं.

दरम्यान, अशोक भट्टाचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे गांगुलींनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीत सौरव गांगुली राजकीय क्षेत्रात आपला नशीब अजमावून पाहणार असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजपने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली तरी ‘या’ पापातून मुक्ती मिळणार नाही”

‘विदर्भवासियांनो मी तुम्हाला वचन देतो की…’; मुख्यमंत्र्यांनी दिला शब्

“6 जूनला राज्यभरात साजरा केला जाणार ‘शिव स्वराज्य दिन’”

अभिमानास्पद! DSP लेकीला आपल्या बापाचा कडक सॅल्यू

“औरंगाबाद नामांतराच्या मुद्दावरून शिवसेनेनं राजकारण न करता ठाम भूमिका घ्यावी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या