बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीवरुन सूत्रं हलणार, प्रणिती शिंदेंना मिळणार ही’ मोठी जबाबदारी?

मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना पाहायला मिळत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातही राजस्थानची पुनरावृत्ती होणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचे राजीनामे मागून नव्याने मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली होती.

महाराष्ट्र काँग्रेसही या निर्णयाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. थेट दिल्लीतून सुत्रं हलणार असल्याने प्रणिती शिंदेच्या मंत्रिपदाच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला गेले होते.

नाना पटोले यांनी मी मंत्रिपदाच्या विषयासाठी दिल्लीला गेलो नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सध्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना व काही मंत्र्यांना दिल्लीला बोलावून काँग्रेस हायकमांड त्यांच्याशी चर्चा करत आहेत. सर्वांशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रातील काही सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल, तर काहींना पक्षाची जबाबदारी दिली जाईल, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असून राजस्थानप्रमाणेच महाराष्ट्रातही फेरबदल होणार का? आणि संभाव्य फेरबदलात प्रणिती शिंदेंना मंत्रिमंडळात काँग्रेस स्थान देणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

“सदाभाऊ पाय पडले तर पडळकर नांगरे पाटलांना भिऊन…”, सदावर्तेंचे नवे गौप्यस्फोट

“…म्हणून मी एक मराठा लाख मराठा घोषणा दिली”, सदावर्तेंचं स्पष्टीकरण

केस कापण्यासाठी गेलेल्या लहान मुलीसोबत धक्कादायक प्रकार; एकाला अटक

भारतातील ‘या’ बड्या कंपनीत मेगाभरती, 1 लाख जागा भरणार

सोन्याच्या भावात काय चाललंय? आज ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More