बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लायगर चित्रपटासाठी विजयने घेतलं कोट्यवधींचं मानधन, आकडा ऐकून थक्क व्हाल

मुंबई । दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आपल्या अभिनयाने आणि बोल्ड लूकने नेहमीच चर्चेत असतो. तरुणी तर त्याच्यावर अक्षरशः फिदाच असतात. नुकताच विजयचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘लायगर’ या चित्रपटातून विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. लायगर या चित्रपटासाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत. 25 ऑगस्ट रोजी त्याचा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, या चित्रपटाचे बजेट तब्ब्ल 90 कोटींच्या आसपास आहे. तसेच हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत असल्याने विजयने 20 ते 25 कोटी रुपये एवढं मानधन घेतलं आहे. करण जोहरची धर्मा प्रॉडक्शन्स कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत असून या चित्रपटात अनन्या पांडे त्याच्या सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More