अभिनेत्री रश्मिकाला पहिल्या चित्रपटासाठी मिळाली होती ‘एवढी’ रक्कम!
मुंबई । नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Actress Rashmika Mandana) तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे. फार कमी वेळात तिने आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे.
फार कमी वयात तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुष्पा द राईज या चित्रपटातून रश्मिकाला चांगलीच पसंती मिळालली. ती नेहमीच काही न काही कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असते.
माध्यमांशी बोलत असताना रश्मिका म्हणाली की , तिला कधीच अभिनेत्री बनायचं न्हवतं. तिला तिच्या वडीलांसोबत त्यांचा व्यवसाय सांभाळायचा होता. लोकांसमोर बोलण्यासाठी तिच्याकडे आत्मविश्वास न्हवतं, म्हणून तीने शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावण्याचा विचार केला. रश्मिकाने आधी मॉडेलिंगच्या दुनियात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या अभिनयाचा प्रवास सुरु झाला. जेव्हा तिने पहिला सिनेमा साईन केला तेव्हा त्याविषयी तिच्या घरचांना काही खबर नव्हती पण पहिल्याच चित्रपटासाठी तिला दीडलाख रुपयांचा धनादेश मिळाल्यावर तिच्या भुवया उंचावल्या. तिने तो चेक तिच्या आईच्या हातात दिला त्यावेळेस तिच्या आईला देखील चांगलाच धक्का बसला.
दुसरीकडे, तिच्या वडिलांना फार आनंद झाला होता कारण, त्यांना अभिनेता बनायचं होतं. चित्रपट पाहण्याची त्यांना प्रचंड आवड आहे. मिशन मजनू आणि ऍनिमल या दोन आगामी चित्रपटात रश्मिका दिसणार आहे. मिशन मजनू मध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत काम करणार असून ऍनिमल या चित्रपटात ती रणबीर कपूर सोबत दिसणार असल्याची माहिती समोर आलीये.
थोडक्यात बातम्या-
‘मिस इंडिया 2022’ ठरलेल्या सिनी शेट्टीबद्दल जाणून घ्या सर्व काही
पावसाळ्यात ‘या’ सोप्या घरगुती उपायांसोबत घ्या तुमच्या त्वेचेची काळजी
‘काय ती शायरी, काय ती अदाकारी…’, चित्रा वाघ यांचा राऊतांना शहाजी बापू स्टाईल टोला
‘काली’ चित्रपट प्रकरणी भारतीय उच्चायुक्तालयाचा निर्मात्यांना दणका
शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, आमदारांपाठोपाठ नगरसेवकही शिंदे गटात
Comments are closed.