रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता आणि रिक्त पदे

Job Updates l सरकारी नोकरी करण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असत. अशातच आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. यावेळी रेल्वे विभागामध्ये ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी असणार आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेसंदर्भांतील सर्व माहिती आपण जाणून घेऊयात…

अर्ज करण्याची अंतिम दिनांक? :

दक्षिण पूर्व रेल्वेने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेद्वारे एकूण 1785 पदे भरण्यात येणार आहेत. तसेच इच्छुक उमेदवार RRC दक्षिण पूर्व रेल्वेच्या rrcser.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन स्वरूपाने अर्ज करू शकतात.

ही भरतीची नोंदणी प्रक्रिया 28 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे. तसेच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

Job Updates l अर्ज शुल्क व वयोमर्यादा? :

याशिवाय उमेदवारांनी वयाची 15 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि 1 जानेवारी 2025 रोजी वयाची 24 वर्षे पूर्ण केलेली नसावी. तसेच या भरतीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. तर SC/ST/PWD/महिला उमेदवारांना या शुल्कातून पूर्णपणे सूट दिली आहे. तसेच या भरती संबंधित अधिक माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.

त्यामुळे इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी rrcser.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात.

News Title –South Eastern Railway Apprentice Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या :

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पवना धरणात घडली दुःखद घटना

पिंपरी-चिंचवडमधील तब्बल ‘एवढ्या’ लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या!

ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट, ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार!

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? अशाप्रकारे काळजी घ्या

वर्षाच्या शेवटी RBI चा सर्वसामान्यांना सर्वात मोठा धक्का!