South Star Ajith Kumar | साऊथ सुपरस्टार अजित कुमार (South Star Ajith Kumar) यांच्या भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. अजित कुमार हे दुबईत सुरू असलेल्या कार रेसिंगमध्ये भाग घेण्यासाठी आले होते.स्पर्धा सुरू होण्यापूर्वी प्रॅक्टिससाठी त्यांनी रेसिंग कार सुरू करताच कारचे टप हवेत उडाले आणि कार जागीच गोल-गोल फिरली. या भीषण अपघातातून अभिनेते अजित कुमार थोडक्याच बचावले आहेत. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अपघाताचा व्हिडिओ पाहून चाहते देखील हादरले आहेत. हा अपघात अत्यंत भयानक होता. अपघात पाहून उपस्थित देखील हादरून गेल्याचे दिसून आले. अभिनेते अजित कुमार यांच्या फॅन्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात स्पष्ट दिसून येतंय की, अजित कुमार रेस सुरू होण्यापूर्वी प्रॅक्टिस करत होते.ही प्रॅक्टिस करत असतानाच त्यांच्या कारचा अपघात घडला.
अजित कुमार यांच्या कारचा अपघात
या अपघातमध्ये अजित कुमार (South Star Ajith Kumar) यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते एकदम सुखरूप आहेत. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.व्हायरल व्हिडीओत कारचे टप हवेत उडालेले स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओ पाहून त्यांना गंभीर इजा तर नाही झाली, असा सवाल सोशल मीडियावर चाहत्यांकडून उपस्थित करण्यात आला. मात्र, अजित कुमार एकदम ठीक आहेत.
कारचे टप हवेत उडून कार भिंतीला जाऊन जोरात आदळली.कार भिंतीला जाऊन आदळल्याने कारचे तुकडे तुकडे झाल्याचं स्पष्टपणे व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे अजित कुमार यांचा जीव वाचण्याचीही शक्यता कमी वाटत होती. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने ते वाचले.
यापूर्वी देखील एका सिनेमाच्या शूटदरम्यान अभिनेत्याचा अपघात घडला होता.विदामुयार्ची नावाच्या सिनेमाची ते शुटिंग करत होते. यावेळी ते कारचा सीन शूट करत होते. त्यावेळी अजित कुमार (South Star Ajith Kumar) यांची संपूर्ण कार उलटली होती. त्यावेळीही ते सुदैवाने बचावले होते. अशात दुबईत त्यांचा अपघात घडलाय.
Ajith Kumar’s massive crash in practise, but he walks away unscathed.
Another day in the office … that’s racing!#ajithkumarracing #ajithkumar pic.twitter.com/dH5rQb18z0— Ajithkumar Racing (@Akracingoffl) January 7, 2025
News Title : South Star Ajith Kumar Car Crash
महत्वाच्या बातम्या –
आज तूळ, कुंभसह ‘या’ राशींना होणार धनलाभ; अश्विनी नक्षत्रात भाग्य उजळणार
संतोष देशमुख यांच्या मारहाणीच्या व्हिडीओमधून धक्कादायक माहिती समोर!
सरपंच हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी केली मोठी मागणी!
HMPV व्हायरसमुळे पुणे महापालिकेने घेतला मोठा निर्णय!
मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख यांचा मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती???