खेळ

आशिया चषक होणार की नाही? याबद्दलचा निर्णय सौरव गांगुलीने केला जाहीर

नवी दिल्ली | महाभयंकर कोरोनाचा क्रिकेटच्या मैदानालाही झटका बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकाचं आयोजन रद्द करत असल्याची घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केली आहे.

सौरव गांगुली म्हणाला, “कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने काही नियम आखले आहेत. सरकारी नियमांच्या अधीन राहून आपल्या पुढची कार्यवाही करणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताचा पुढील आंतराष्ट्रीय सामना किंवा मालिका कधी होईल हे आताच सांगू शकत नाही.”

“शेवटी खेळाडूंचा आरोग्याचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा आहे आणि खेळाडूंचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असल्याने आम्ही आशिया चषकाचं आयोजन रद्द करत आहोत. त्याचबरोबर यंदाची आयपीएल भारातमध्येच व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”, असंही सौरव गांगुलीने यावेळी सांगितलं.

दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. जसा कोरोनाचा संसर्ग कमी होईल तसं आपल्याला स्पर्धेविषयी विचार करता येईल. जर भारतात आयपीएल शक्य झाली नाही तर श्रीलंकेत आणि दुबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. तिकडे देखील मॅचेस खेळवल्या जाऊ शकतात मात्र तसं आणखी काही ठरलेलं नाही किंवा चर्चा देखील झाली नसल्याचं सौरवने नमूद केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

सामनाच्या रोखठोकमध्ये ‘हे’ छापून दाखवा, चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना चॅलेंज

आतापर्यंत 25 लाख 77 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

रूग्णसंख्या वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितली दिलासादायक बातमी!

महत्वाच्या बातम्या-

लष्कराचा मोठा निर्णय, जवानांना मोबाईलमधून फेसबुक इंस्टाग्रामसह 89 अ‌ॅप डिलीट करण्याचे आदेश

धक्कादायक! प्रसूतीसाठी महिलेची २३ किलोमीटरची पायपीट… नदीनाल्यातून, घनदाट जंगलातून प्रवास

आतापर्यंत 25 लाख 77 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या